Satyacha Morcha Live : 'सत्याचा मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतेय? अविनाश जाधवांचा भाजपवर थेट हल्लाबोल

MNS Avinash jadhav on Satyacha Morcha Live : मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात निघालेल्या मोर्चादरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "मोर्चा आयोगाविरोधात, मग सरकार का नाचतं?" असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी भाजप-आयोग संबंधांवर गंभीर आरोप केले.

Avinash Jadhav statement against BJP during EC protest Satyacha Morcha Latest Update : आमचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे. यामध्ये सरकारचा काय संबंध? सरकार का मधे मधे नाचत आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, तर भाजपचा आंदोलन करण्याचा काय संबंध येतो, असा टोला मनसे नेते अविनाश जाधव यांनी लगावला आहे.

भाजपचे घर आणि दुकान हे निवडणूक आयोगाच्या मदतीनेच चालतेय, त्यामुळेच ते आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आयोगाच्या मदतीने अनेकजण निवडणूक आलेले नेते आहेत, असा टोला जाधव यांनी केला. अविनाश जाधव यांनी नेमकं काय म्हटले..

मुंबईत आज निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे...या मोर्चात शरद पवारांसह, ठाकरे बंधू, काँग्रेस, भाकप, माकप पक्ष सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात वातावरण निर्मितीसाठी ठाकरेंसेना, राष्ट्रवादी, मनसेचे झेंडे लावण्यात आलेत. फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com