Maharashtra Cabinet Meeting  Saam Tv
महाराष्ट्र

Cabinet Meeting: फडणवीस सरकारने घेतले ४ मोठे निर्णय, मुंबई-कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला होणार फायदा

Maharashtra Cabinet Meeting: फडणवीस सरकारने मुंबई-कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठे निर्णय घेतले आहे. आज झालेल्या कॅमिनेट बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. बैठकीमध्ये नेमकं काय झालं? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय घेण्यात आले.

  • मुंबईतील टाटा आयुर्वेदिक कर्करोग रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफी.

  • कोल्हापुरात महिला सहकारी वसाहतीसाठी २.५० हेक्टर जमीन मंजूर.

  • सिंधुदुर्गमधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यास मान्यता.

  • वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ कर्मचाऱ्यांची सेवा नियमित.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ४ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीमध्ये महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यासाठी निर्णय घेण्यात आले. या निर्णयाचा फायदा मुंबईसह कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय झाले?

१) मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

२) कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

३) सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला - कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्यात आली. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

४) राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता देण्यात आली. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रोफेशनल कोर्सेसमधून 10,000 कोटींची लूट? विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ, शुल्कनियमक प्राधिकरणावर गंभीर आरोप

Maharashtra Politics: निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचा अजित पवारांना दे धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Shukra Gochar 2026: 12 महिन्यांनी शुक्र करणार शनीच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Best Sleeping Time: वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT