'शिवाजी महाराज ओबीसी होते' जानकारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य - संभाजी ब्रिगेड SaamTV
महाराष्ट्र

'शिवाजी महाराज ओबीसी होते' जानकारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य - संभाजी ब्रिगेड

'काही मराठ्यांच अज्ञान असल्यामुळे आम्ही मागास नाही अशी अज्ञानापोटी भूमिका घेतली होती तर कुणबी, मराठा, देशमुख, पाटील असा वाद निर्माण करून जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे.'

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) काळात SC, ST OBC असं जरी नसलं तरी महादेव जानकर म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे. मराठा हा शब्द समूह वाचक शब्द आहे. राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध, गुजरात, मराठा असे म्हटले आहे. तर मराठा मांग, मराठा साळी, मराठा कोळी, मराठा चांभार, मराठा माळी, मराठा तेली, मराठा कुणबी असं होतं. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले आहे."बरे झाले देवा कुणबी झालो। नाहीतर दंभेची असतो मेलो"

हे सर्व बघता स्वातंत्र्योत्तर काळात एस.सी. एस.टीला आरक्षण दिले गेले. ओबीसीला आरक्षण (OBC Reservation) देत असताना मराठा समाज कुणबी आहे. ओबीसी ला पात्र आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा. अशा भूमिका आणि मागणी ही भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh) यांनी केली होती. परंतु काही मराठ्यांच अज्ञान असल्यामुळे आम्ही मागास नाही अशी अज्ञानापोटी भूमिका घेतली होती तर कुणबी, मराठा, देशमुख, पाटील असा वाद निर्माण करून जाणीवपूर्वक तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे मराठा सेवा संघ, (Maratha Seva Sangh) संभाजी ब्रिगेडची (Sambhaji Brigade) सुरुवातीपासूनची मागणी आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केला जावा. कारण विदर्भ, खानदेश व कोकणात कुणबी म्हणून आरक्षण मिळालेच आहे. हे सर्व बांधव आहेत. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश समावेश हा मराठा (Maratha) समाजाचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून या राज्यात या देशात सामाजिक समता प्रस्थापित करावी ही आमची भूमिका आणि मागणी असल्याचं डॉ. शिवानंद भानुसे प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र यांनी सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT