सातारा : राजवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि रामदास स्वामी (ramdas swami) यांच्या भेटीच्या शिल्प सातारा (satara) शहरातील राजवाडा बसस्थानक (satara rajwada bus station) परिसरात उभारले आहे. या शिल्पाचे शिवभक्तांनी आणि हिंदुत्ववादी संघटनेने गनिमी कावा करत साेमवारी लोकार्पण केले. या वेळी " जय श्री राम', छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि समर्थ रामदास स्वामी यांची प्रतिकृती असलेल्या शिल्पाचे साेमवारी राजवाडा बस स्थानकात शिवप्रेमींनी उदघाटन केले. यावेळी मिलिंद एकबोटे (milind ekbote) आणि भाजप (bjp) नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
या शिल्पास इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे (shrimant kokate) आणि काही संघटनांचा विरोध होता. त्यामुळे त्याचे उदघाटन लांबणीवर पडले होते. राजवाडा बसस्थानक परिसरात हे शिल्प उभारले गेले असल्याने एसटी महामंडळाने (msrtc) या कार्यक्रमास मनाई केली होती. साेमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक शिवप्रेमी एकत्र येत त्यांनी राजवाडा बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्पकृतीचे उदघाटन केले.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल (anchal dalal) या पोलिस फाैजफाट्यासह राजवाडा बसस्थानक येथे आल्या. त्यांनी शिवप्रेमींची धरपकड करत ताब्यात घेतले. यामध्ये मिलींद एकबाेटेंसह ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरुन दहा ते १२ चार चाकी आणि २५ दुचाकी पाेलिसांनी ताब्यात घेतल्या. यावेळी काही काळ राजवाडा परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. त्यामुळे पोलिसांचा माेठा बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.