Fake Government Scheme X
महाराष्ट्र

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Fact Check : तुमच्या मुलांना आता दरमहा 3 हजार रुपये मिळू शकतात...केंद्र सरकारची अशी योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच अशी योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

सरकार आता मुलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार आहे असा दावा एका व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. जर एखाद्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाव टाका असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे या व्हिडिओवरून लोकांना विश्वास बसू लागलाय...पण,खरंच आता सरकार मुलांना पैसे देणार आहे का...?...

...हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय...काहींनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नावही टाकलंय...पण, खरंच केंद्र सरकारची अशी योजना आहे का..? पालक माता-पिता योजना सरकारने मुलांसाठी सुरू केलीय का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, पैसे मिळत असतील तर ते कसे मिळतात हे सोप्या पद्धतीत सांगायला हवं...आणि गरजूंना याचा फायदा व्हायला हवा...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

पालक माता-पिता योजना केंद्र सरकारची नाही

ही योजना गुजरात सरकारची आहे

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या निराधार मुलांना दरमहा 3 हजार मिळतात

निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी पैसे सरकार देतं

मूल 18 वर्षांचे झाल्यावर सरकार मदत थांबवते

मात्र, देशातील मुलांना दरमहा 3 हजार रुपये मिळणार हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...ही योजना निराधार मुलांसाठी गुजरात सरकारने राबवलीय...आपल्या राज्यातही काही निराधार मुलांना सरकार मदत करतं...मात्र, दरमहा केंद्र सरकार 3 हजार देतं हा दावा दिशाभूल करणारा आहे...त्यामुळे तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT