gas cylinder  Saam tv
महाराष्ट्र

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Panic Over LPG Shortage: गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे राज्यात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. अशामध्ये सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमागचं सत्य का आहे? ते घ्या जाणून...

Priya More

Summary:

  • गॅस सिलिंडर बंद झाल्याचा व्हायरल मेसेज

  • गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी

  • घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचा निर्णय

  • एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारचे स्पष्टीकरण

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये गॅस सिलिंडरसाठी नागरिकांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. गॅस सिलिंडरसाठी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. एलपीजी सिलिंडरच्या बुकिंग आणि खरेदीबाबत देशभरातील अनेक शहरांमध्ये तणावाचे वातावरण आहे. गॅस सिलिंडर मिळणार नाही असे मेसेज व्हायरल होत आहेत. खरंच गॅस सिलिंडर मिळणार नाही का? या व्हायरल मेसेज मागचं सत्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत...

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या कमतरतेच्या वृत्तामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि एचपीच्या सिलिंडर पुरवठा केंद्रांवर सर्वसामान्य नागरिकांनी गर्दी केली आहे. गॅस सिलिंडर मिळेल की नाही याची चिंता सर्वांना लागली आहे. अशामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा करणं थांबवण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबची घोषणा केल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. या मेसेजनंतर आता सरकारनेच स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत हा मेसेज अफवा असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'महाराष्ट्रात व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे दिशाभूल करणारे आहेत. घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. भू-राजकीय परिस्थिती आणि केंद्र सरकारचे निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासंदर्भातील प्राधान्यक्रमात तात्पुरता बदल होऊ शकतो. मात्र, व्यावसायिक एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.'

दरम्यान, सरकारने लोकांना अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.देशात व्यावसायिक सिलिंडरच्या कमतरतेपासून सुरू झालेली समस्या आता घरगुती सिलिंडरच्या पुरवठ्यापर्यंत पसरली आहे. तर, केंद्र सरकारने सांगितले आहे की, सध्या देशात एलपीजीची कमतरता नाही आणि या संदर्भात पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्रीरामपूरमध्ये हॉटेलवर छापा; घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर उघड, 10 सिलिंडर जप्त

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT