MSRTC Pandharpur 2025 Special Buses saam tv
महाराष्ट्र

ST Bus : माघवारीनिमित पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी Good News! एसटीच्या ११० जादा बस धावणार

MSRTC Pandharpur 2025 Special Buses: माघवारीनिमित विठूरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान सोलापूर,अक्कलकोट येथून जादा बसेस चालवण्यात येणार आहे.

Saam Tv

माघवारीनिमित वाढीव एसटी गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांना अखेर दिलासा मिळाला आहे.यंदाच्या माघवारीसाठी राज्य परिवहन महामंडळने जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्यावर्षी वारीसाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे बस कमी पडल्यामुले आलेल्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.मागच्या वर्षी झालेली गर्दी लक्षात घेता यंदा प्रवासी मागणी वाढल्याने 110 गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. वारीदरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महामंडळाने स्थानक आणि आगारांमध्ये वरिष्ठ कर्मचाऱ्यांना तैनात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पंढरपूराला दर एकादशीला राज्यासह देशभरातून लाखो भक्तगण हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात. यामुळे त्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून त्यांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येते.यामध्ये अक्कलकोट आणि पंढरपूर विभागातून जवळपास 40 जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर इतर तालुक्यातून 110 अतिरिक्त बस धावणार असल्याचे राज्य परिवहन मंडळाने सांगितले आहे.

सोलापूरमधून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त प्रमाणात असते.यामुळे सोलापूर आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा बस येत्या ७ फेब्रुवारीपासून ते पौर्णिमा म्हणजेच १२ फेब्रुवारीपर्यंत असणार आहेत.भाविकांची संख्या लक्षात घेता ऐनवेळी या बसच्या संख्यांमध्ये आणखी वाढ केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाने नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT