धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांना विष देऊन केली आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांना विष देऊन केली आत्महत्या

एका पित्यानेच आपल्या पोटच्या चार मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेळगाव : एका पित्यानेच आपल्या पोटच्या चार मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामधील बोरगल या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल हादिमानी (वय- ४६) आहे. तर सौम्या (वय- १९), स्वाती (वय- १६). साक्षी (वय-१२) आणि श्रीजन (वय-१०) अशी या चार मुलांची नावे आहेत.

हे देखील पहा-

दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बेळगाव येथील संकेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील बोरगल येथील गोपाल हादिमानी यांच्या पत्नीचे २ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. ब्लॅक फंगसमुळे त्यांची पत्नी जया हादिमानी यांचा मृत्यू झाला होता.

तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नैराश्यात जीवन जगत होते. पत्नीच्या मृत्यूनंतर अत्यंत नैराश्येतून पतीने आपल्या चारही मुलांना विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. गोपाल हादिमानी हे माजी सैनिक होते. दोन महिन्यांअगोदर पत्नीचे निधन झाल्यामुळे तो उद्ध्वस्त झाला होता. तो आपल्या चारही मुलांसह या ठिकाणी राहत होता.

मात्र, शनिवारी सकाळी त्याने मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, एकाच घरातील ५ जणांच्या मृत्यूमुळे बेळगावसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेह बघण्याच्या वेळी नातेवाईक, ग्रामस्थ आणि शेजाऱ्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Tuesday Horoscope : करिअरमध्ये नव्या संधी मिळतील, 5 राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा आजचे राशीभविष्य

Latur Bus Accident: मनोरुग्ण प्रवाशानं बसचं स्टेअरिंग ओढलं; दोन स्कूल बस धडाधड धडकल्या

Nashik Earthquake: नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; शेतजमिनींना भल्या मोठ्या भेगा, घराच्या भिंती थरथरल्या

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT