डिसले गुरुजींना पैसे कोणी मागितले याचे स्पष्टीकरण द्या, जिल्हा परिषदेने दिली नोटीस...  Saam Tv
महाराष्ट्र

डिसले गुरुजींना पैसे कोणी मागितले याचे स्पष्टीकरण द्या, जिल्हा परिषदेने दिली नोटीस...

विश्वभुषण लिमये

सोलापूर: रजेचा अर्ज प्रलंबित ठेऊन पैसे कोणी मागितले आणि मानसिक त्रास कोणी दिला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी नोटीस (Notice) सोलापूर जिल्हा परिषदेने (Solapur ZP) ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी सांगितले आहे. माढा (Madha) तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील ग्लोबल टिचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेतील (America) फुलब्राईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

हे देखील पहा-

यातून डॉक्टरेटसाठी अमेरिकेत ऑगस्टमध्ये जाण्यासाठी संस्थेला जिल्हा परिषदेच्या परवानगीचे पत्र 25 जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्यक होते. यासाठी डिसले यांनी केलेला अर्ज शिक्षण विभागाने दीड महिने प्रलंबित ठेवण्यात आला होता. पाठपुरवठा केल्यावर मानसिक त्रास दिला आणि पैश्यांची मागणी केली, असा आरोप डिसले गुरुजींनी प्रसारमध्यमांमध्ये जाहीरपणे सांगितला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडून दखल घेण्यात आली आणि डिसले यांना तात्काळ परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

त्याप्रमाणे प्रशासनाने (Government) रविवारी कामकाज करीत त्यांना परवानगी दिली आहे. मात्र, मानसिक त्रास आणि पैश्यांच्या मागणीच्या आरोपमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा मालिन झाली आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत प्रशासनाने खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT