Samruddhi Highway  Saamtv
महाराष्ट्र

Samruddhi Highway: वेगमर्यादा ओलांडाल तर वाहन होईल ब्लॅक लिस्ट; काय आहे समृद्धी महामार्गावरील एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम?

exit management system On Samruddhi Highway: जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडली तर तुमचे वाहन थेट ब्लॅक लिस्ट केले जावू शकते.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Samruddhi Highway News: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात (Road Accident) सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरताना दिसत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. वारंवार वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना देवूनही चालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. यावर आता प्रशासनाने नवीन पर्याय शोधून काढला आहे.

त्यानुसार, समृद्धी महामार्गावर आता एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम (Exit Management System) राबविली जाणार आहे. जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडली तर तुमचे वाहन थेट ब्लॅक लिस्ट केले जावू शकते. काय आहे ही एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम, चला जाणून घेवू. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग कडून विविध मोहीम राबवली जात आहेत. यामधे आता परिवहन विभागाकडून वाहनांना ब्लॅक लिस्ट आणि दंड ही केल्या जात आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई चार ठिकाणी इंटर चेंज आहे.

जर वाहन एका इंटरचेंजवरून दुसऱ्या इंटरचेंजला ठरलेल्या वेळेच्या आत पोहचले तर त्या टोल नाक्यावर सायरन वाजेल आणि ते वाहन काही वेळेसाठी ब्लॅक लिस्ट होईल. इतकेच नव्हे तर उप प्रादेशिक विभागाकडून त्या चालकाचे समुपदेशन करण्यात येईल.

तसेच त्याला वाहन 120 वेगाच्या आतच चालवण्याचे आवाहनही करण्यात येईल. दरम्यान, चालकाने पुन्हा वेळेची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आपले वाहन ठरलेल्या वेळेतच चालवावे, अन्यथा आपल्याला दंड ही भरावा लागेल, असे आवाहन उप्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT