Examination Of Teachers Saam Tv
महाराष्ट्र

Examination Of Teachers: मराठवाड्यातील गुरुजींना वाटते परीक्षेची भीती, ८ हजारांपैकी फक्त ९७७ शिक्षकांची हजेरी

संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारावर शिक्षक आहेत. मात्र त्यापैकी अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर आहेत.

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Sambhajinagar Teacher's Exam: मराठवाड्यात आज विभागीय आयुक्त कार्यालयाकडून शिक्षकांची परीक्षा घेण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा शिक्षणाचा आणि शिकवण्याचा स्तर वाढवा म्हणून या परीक्षेचा आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेत संभाजीनगरातील शिक्षकांनी पाठ फिरवली आहे.  (Latest Marathi News)

अवघा एक टक्का पेक्षा कमी शिक्षक या परीक्षेला उपस्थित आहेत. संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मिळून 8 हजारावर शिक्षक आहेत. मात्र त्यापैकी अवघे 977 गुरुजी परीक्षेला हजर आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मराठवाड्यातील (Marathwada) जिल्हा परिषद शिक्षकांसाठी हे आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त झालेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ही परीक्षा होती. शिक्षकांच्या शिक्षणाचा शिकवण्याचा स्तर वाढावा यासाठी या परीक्षेचा आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

मात्र या परीक्षेला अनेक शिक्षक संघटनांचा विरोध केला होता. मराठवाड्यात 23 हजार शिक्षकांनी या परीक्षा द्यायची तयारी दर्शवल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं होतं. आता नक्की किती शिक्षकांनी परीक्षा दिली हे परीक्षा झाल्यावरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ ODI: पहिल्याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत, या खेळाडूला मिळाली संधी

Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य...

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT