Sugarcane Price Saam tv
महाराष्ट्र

Ethanol Production: इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय अखेर मागे; शेतकरी, कारखानदारांना मोठा दिलासा

Ethanol Production: ऊसाचा रस आणि मॉलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला घातलेली बंदी अखेर सरकारने मागे घेतली आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकरी तसेच कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

Gangappa Pujari

Ethanol Production News:

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ऊसाचा रस आणि मॉलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला घातलेली बंदी अखेर सरकारने मागे घेतली आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकरी तसेच कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ७ डिसेंबर रोजी परिपत्रक काढून २०२३-२४ मध्ये साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्याचबरोबर या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचेही सरकारने स्पष्ट केले होते. सरकारच्या या निर्णयाला शेतकऱ्यांसह अनेक नेत्यांचा विरोध होता.

या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवता येईल, असे मानले जात होते. अखेर निर्णयावर वाढता विरोध पाहता १५ दिवसातच केंद्र सरकारने आपला हा निर्णय मागे घेतला आहे. निर्णय मागे घेतल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सरकारचे आभार मानलेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली असली तरी फक्त १७ लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्याची परवानगी साखर कारखानदारांना देण्यात आली आहे. ही अट सरकारने ३५ लाख टनापर्यंत करावी.. अशी नवी मागणी स्वाभिमानीचे (Swabhimani Shetkari Sanghatana) राजू शेट्टी यांनी केली आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील घेणार शहांची भेट..

"केंद्र सरकारने काही सुधारणा करुन इथेनॉल निर्मिती बाबत परिपत्रक काढले आहे ही दिलासादायक बाब आहे. मात्र अजुनही इथेनॉल निर्मिती बाबत काही सुधारणा व्हायला हव्यात," यासाठी लवकर दिल्लीत जाऊन बाजु मांडणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT