MLA Ramdular Gond: अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, BJP आमदाराला 25 वर्षांची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UP Crime News: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
MLA Ramdular Gond
MLA Ramdular GondSaam Tv
Published On

MLA Ramdular Gond:

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने भाजप आमदार रामदुलार गोंड यांना 25 वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

दंडाची रक्कम पीडितेला मिळणार आहे. सोनभद्रच्या खासदार-आमदार न्यायालयाने (MP- MLA) अलवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2014 मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षांच्या दीर्घ सुनावणीनंतर हा निकाल आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Ramdular Gond
Kalyan Politics: आदित्य ठाकरे कल्याणमधून निवडणूक लढणार? ठाकरे-शिंदे गटाकडून आव्हान-प्रतिआव्हान

आमदारकी होणार रद्द?

आठ वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायालयाचे न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानंतर रामदुलार गोंड यांचे आमदारकी रद्द होईल, असं बोललं जात आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदारांच्या वकिलांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

तत्पूर्वी, 12 डिसेंबर रोजी न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भाजप (BJP News) आमदार रामदुलार गोंड (MLA Ramdular Gond News) यांना दोषी ठरवले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाचे न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी शिक्षेसाठी 15 डिसेंबरची तारीख निश्चित केली होती.

MLA Ramdular Gond
Who is Salim Kutta: कोण आहे सलीम कुत्ता?

आमदार (BJP MLA) रामदुलार गोंड यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेबद्दल पीडितेच्या भावाने आनंद व्यक्त केला. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आलेल्या पीडितेच्या भावाशी या संदर्भात प्रश्न विचारला असता, त्याने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाने खूप आनंदी आहे. नऊ वर्षांच्या संघर्षानंतर आज त्यांना न्याय मिळाला आहे. पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून रामदुलार गोंडवर नऊ वर्षांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com