End Life Due To Mental Trauma  Saam Tv
महाराष्ट्र

Court Verdict : ब्रेकअपनंतर मानसिक तणावातून केलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हणू शकत नाही; कोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

Rohini Gudaghe

End Life Due To Mental Trauma After Break Up

मुंबई सत्र न्यायालयानं एका आत्महत्येप्रकरणी (End Life) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रेमप्रकरणात ब्रेकअप झाल्यानंतर केलेली आत्महत्या, ही आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांच्या श्रेणीत येत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणात दंडात्मक कारवाईसाठी कोणताही कायदा नसल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. (latest marathi news)

न्यायालयानं एका महिलेला तिच्या माजी प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करताना, हे निरीक्षण नोंदवलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एनपी मेहता यांनी २९ फेब्रुवारी रोजी हे निरीक्षणं नोंदवलं (Bombay Sessions Court) आहे. त्यांनी मनीषा चुडासामा आणि तिचा होणारा नवरा राजेश पनवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या दोघांवर नितीन केणी या तरूणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण?

नितीन केनी नावाच्या तरूणाने 15 जानेवारी 2016 रोजी त्याच्या घरात आत्महत्या केली होती. नितीन आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते. त्यांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपनंतर नितीनला धक्का बसला होता. मानसिक तणावातून (Mental Trauma After Break Up) त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याच्या प्रेयसीवर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी न्यायाधीश म्हणाले की, 'नैतिकदृष्ट्या, बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड बदलणं चुकीचं आहे, परंतु जर दंडात्मक कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर, जोडीदार स्वतःच्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करीत असेल त्याच्यावर कोणतंही बंधन (Break Up)नाही. त्यामुळं ब्रेकअपनंतर केलेली आत्महत्या ही आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या श्रेणीत येत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

ब्रेकअपनंतर केलेली आत्महत्या

न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात म्हटलंय की, कलम 306 नुसार, आरोपीला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यासाठी काहीतरी कृत्य केलं पाहिजे. जर कोणी कोणावर प्रेम करत असेल आणि जोडीदार संबंध तोडत असेल, तर ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या (end life after break up) तुटते. जर प्रेमसंबंध तुटले आणि मानसिक धक्क्यातून आत्महत्या केली, तर कलम 306 सह कलम 107 अन्वये त्याचा/तिचा खटला चालवला जाऊ शकत नाही.

मनिषा चुडासामा आणि पनवार यांनी पीडित तरूणाचा मानसिक छळ करून त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा युक्तिवाद फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आला (court news) होता. पीडित तरूणाच्या वकिलानं म्हटलंय की, नितीन आणि मनिषाचे प्रेमसंबंध होते. पण मनिषाने नितीनला सोडून दुसऱ्या तरूणासोबत लग्न केलं. त्यामुळं नितीन मानसिक तणावात गेला अन् त्याने जीवन संपवलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT