Ahmednagar Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : कामावर यायला उशिर झाला, मालकिणीने जाब विचारताच कामगाराने केलं संतापजनक कृत्य

Ahmednagar Crime News : ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या गावात घडली आहे.

Shivani Tichkule

सुशिल थोरात

Ahmednagar News : कामावर उशिरा का आलास असे विचारल्याने संतप्त झालेल्या कामगाराने चाकूने सपासप वार करून मालकिणीचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या गावात घडली आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी खंडू काशिनाथ चंदन यांच्या फिर्यादीवरून मयूर संजय भागवत यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विवेक आर्टस् हा गणपती मूर्ती बनवण्यच्या कारखान्यात कामास असणाऱ्या मयूर भागवत या मूर्ती कारागिराने शुल्लक कारणावरून कारखान्याच्या मालक असणाऱ्या ताराबाई काशिनाथ चंदन या 72 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर चाकूने साप सप वार करून गंभीर जखमी केले होते.

मात्र गंभीर जखमी अवस्थेत ताराबाई यांना अहमदनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असताना उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मयूर भागवत याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ताराबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर खून करणे 302 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर हा 30 मार्च रोजी सुट्टी घेऊन अहमदनगर येथे आपल्या घरी गेला होता मात्र त्याला कामावर येण्यास उशीर झाल्याने ताराबाई चंदन याने त्याला याबाबत तु कामावर काल येणार होता उशीर का केलास असे विचारले होते. यावर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.

मात्र यावेळी ताराबाई यांच्या मुलाने हे भांडण सोडवले होते. त्यानंतर रात्री ताराबाई या झोपलेल्या असताना आरोपी मयूर भागवत याने ताराबाई यांच्या चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. मात्र, त्यांचा खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणी मयूर भागवत याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Office Hairstyles: मेसी वेणी आणि बबल पोनीटेल, ऑफिस आणि कॉलेजसाठी 5 मिनिटांत होतील अश्या झटपट 5 हेअरस्टाईल्स

Kidney disease symptoms: किडनी खराब होण्याआधी ही लक्षणं लगेच ओळखा, मान आणि चेहऱ्यावर मिळतात संकेत

Health Tips : मानेचं दुखणं हे तीव्र डोकेदुखीचं कारण असू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं, असं का होतंय?

Crime: पुणे हादरले! कॉलेजबाहेर विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

SCROLL FOR NEXT