Beed News : उचल देतो म्हणून बोलावलं अन् ऊसतोड कामगार महिलेसोबत बळजबरीने केलं भयंकर कृत्य

Crime in Beed : बीडच्या वडवणी येथील धक्कादायक घटना...
Beed News
Beed NewsSaam Tv
Published On

Beed Crime News : ऊसतोड कामगार महिलेला, ऊसतोडणीची उचल देतो असे सांगून लाॅजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या वडवणीमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुकादमाविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकादम मुंजा रतन वाघमारे अस आरोपीचं नावं आहे.  (Latest Marathi News)

Beed News
Mumbra News : मुंब्य्रात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न, तरुणाला चोप चोप चोपलं

पिडीतेन मुकदामाला फोन करत पुढच्या वर्षीसाठी ऊसतोडणीची उचल म्हणून पैसे देण्याची मागणी केली. यावर मुंजा वाघमारे याने तिला वडवणीला ये, असा निरोप दिला. वडवणीत आल्यावर कॉल केल्यानंतर त्याने एका लॉजचा पत्ता दिला. यावेळी तिच्याच गावातील दत्ता गायकवाड ही व्यक्ती खाली होती. त्याने पीडितेच्या चार वर्षांच्या मुलीला स्वत:जवळ ठेवत, मुकादमाकडून पैसे घेऊन खाली आल्यावर मुलीला घेऊन जा, असे सांगितले. (Beed Crime)

Beed News
Nitin Gadkari Threat : नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जेलमधील गुंडाचा धक्कादायक खुलासा; पोलिसांना म्हणाला...

त्याप्रमाणे पीडिता पैसे आणण्यासाठी गेली असता दुसऱ्या मजल्यावर थांबलेल्या मुंजा वाघमारे याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने कशी तरी सुटका करत घर गाठले. पतीसह नातेवाइकांना हा प्रकार सांगितला आणि रात्री उशिरा वडवणी पोलीस (Police) ठाणे गाठले. दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून मुकादम मुंजा वाघमारे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com