
कल्पेश गोर्डे
Mumbra Police : मुंब्रा येथील एका अल्पवयीन तरुणीसोबत गैरवर्तन करणाऱ्या एका विकृत तरुणाला रंगेहाथ पकडून स्थानिकांनी चांगलाच चोप दिला आहे. या विकृत तरुणाला चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)
ठाणे (Thane) मुंब्र्यातील रॉयल गार्डन परिसरातील झैनबिया एफ विंगमध्ये राहणाऱ्या 6 आणि 9 वर्षीय दोन अल्पवयीन तरुणी खेळत असताना शिमला पार्क जवळील एक विकृत तरुण शुक्रवारी 31 मार्च रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी आला. या विकृताने त्यांना रॉयल गार्डनच्या झेनबिया एफ विंगमध्ये आमिष दाखवून घरी सोडतो असे सांगितले.
त्यानंतर त्याने एका मुलीला इमारतीच्या खाली सोडले आणि दुसऱ्या मुलीला इमारतीच्या टेरेसवर गेला. पहिल्या मुलीने आपली मैत्रीण दिसली नाही म्हणून ती आरडाओरड करून रडू लागली. स्थानिकांनी तिला विचारपूस केली असता तिने घडलेलं प्रकार सांगितला. (Thane Crime News)
दुसऱ्या मुलीची शोधाशोध केली असता त्यांना इमारतीच्या टेरेसवर ती अल्पवयीन मुलगी आणि तो विकृत आढळून आला. दुसरी मुलगी ही घाबरलेली आणि रडत होती हा विकृत तिच्यासोबत घाणेरडे कृत्य करणार तितक्यात रहिवाशी पोहचल्याने आणि तरुणी थोडक्यात वाचवली.
या विकृतला रंगेहाथ पकडल्यानंतर रहिवाश्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचताच स्थानिकांनी या विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.