Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: पप्पा मुंबईला निघाले, मुलींना अश्रू अनावर, एकीला आली चक्कर; तरीही मनोज जरांगे पुढे निघाले; भावुक VIDEO व्हायरल

Maratha Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. अंतरवाली सराटीवरून ते मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. जरांगे कुटुंबियांच्या भावनिक क्षणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे मोर्चासाठी अंतरवाली सराटीतून मुंबईला रवाना झाले.

  • रवाना होताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

  • सोलापूरसह राज्यभरातील महिला आंदोलनासाठी खाद्य मेजवानीची तयारी करत आहेत.

  • पैठणमध्ये जरांगे यांचे जेसीबीवरून फुलांची उधळण करून स्वागत होणार आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. ठरल्याप्रमाणे ते आज मोर्चा घेऊन अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे कुटुंबीयांकडून औक्षण करण्यात आले. यावेळी जरांगे यांची बायको आणि मुलींना अश्रू अनावर झाले. त्यांची बायको आणि मुली गळ्यात पडून रडल्या. यावेळी जरांगे देखील भावुक झाले. त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले. यावेळी त्यांच्या एका मुलीला चक्कर आली. तरी देखील मनोज जरांगे पुढे निघून गेले. जरांगे कुटुंबीयांच्या या भावनिक क्षणाचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना मुंबईला येण्याचे आवाहन केले. त्यामुळे जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. ज्या पद्धतीने मुंबईला जाण्यासाठी पुरूष मंडळी तयरी करत आहेत. त्याच पद्धतीने महिला देखील तितक्याच तत्पर दिसत आहेत.

मुंबईला जाणाऱ्या पुरुषांसाठी महिलांची खाद्य मेजवानीसाठीची तयारी सुरू केली आहे. घरातील कर्ता पुरुष मुंबईला जात असल्याने महिला भावुक झाल्या. सोलापूरातील घराघरातून मुंबईला जाणाऱ्या पुरुषांच्या न्याहारीसाठी चिवडा, चकली, शेंगाच्या पोळ्या, कडक भाकरी, शेंगा चटणी अशा मेजवाण्या पुरुषांना बांधून देण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. मात्र घरातील पुरुष मंडळीना मुंबईला पाठवत असताना महिलांना अश्रू अनावर झाले आहे.

मनोज जरंगे पाटील यांचा मोर्चा संभाजीनगर जिल्ह्यात काही वेळात प्रवेश करणार आहे. पैठण तालुक्यातील हीरड पुरी येथे गावकऱ्यांकडून मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी ५ जेसीबी लावण्यात आले आहेत. या जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे. दरम्यान, नुकताच मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

SCROLL FOR NEXT