Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. बीडवरून निघालेल्या मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. ते आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईकडे निघण्यापूर्वी त्यांनी मराठी बांधवांशी संवाद साधत त्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसंच, 'आता थांबायचे नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. आता आरपारची शेवटची लढाई लढायची. यानंतर तक धरून लढाई जिंकू शकतो. अशी लढाई जगाच्या पाठिवर कधी झाली नसेल इतक्या शांत डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तर हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा.', असे जरांगेंनी मराठा आंदोलकांना सांगितले. त्याचसोबत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना महत्वाचा सल्ला देखील दिला. ते म्हणाले, 'समाजाची मान खाली होईल असे एकानीही वागायचे नाही. आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आपण शांत डोक्याने जायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com