Electricity Gone In Amravati अमर घटारे
महाराष्ट्र

Amravati : आमला गावात ४ दिवसांपासून बत्ती गुल; नागरिकांचे प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन

Electricity Gone In Amravati : शुक्रवारी संपूर्ण गावकरी अमरावती वीज वितरण कार्यालयात जमले आणि प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वलगावलगत असलेल्या अमला या गावातील वीजपुरवठा तब्बल चार दिवसापासून खंडित असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत. याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी संपूर्ण गावकरी अमरावती वीज वितरण कार्यालयात जमले आणि प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन केले. श्री वसु महाराज प्रहार जनशक्ति पक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. (Electricity Gone In Amravati)

हे देखील पाहा -

गेल्या ७० वर्षांपासून आमला गावात वीजपुरवठा करणारे विद्युत खांब पावसामुळे गंज लागून जमिनीवर पडलेले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या घराचा वीजपुरवठा संपूर्ण खंडित झाला. मात्र ज्यांच्या शेतामध्ये हे खांब पडले आहे त्यांनी चक्क "चाळीस लाख रुपये द्या, नाहीतर मी माझ्या शेतातील खांब उभे करू देत नाही" असा इशारा दिल्यावर नागरिक विचारात पडले. या ठिकाणी महावितरण कार्याचे कर्मचारी आले असताना त्या कर्मचाऱ्यांना देखील त्या शेतकऱ्यांनी शिवीगाळ केली, त्यामुळे ते विद्युत खांब उभे करू शकले नाही.

या सर्व प्रकारात गेल्या चार दिवसापासून गावातील संपूर्ण वीज पुरवठा खंडित झाल्याने पावसाळ्याच्या दिवसात लोकांना अंधारात राहावं लागत आहे. त्यामुळे "आज, शुक्रवारी सहा वाजेपर्यंतच आमची वीज जोडणी करावी नाहीतर आम्ही या कार्यालयात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू" असा इशारा आज ग्रामस्थांनी दिला. या आंदोलनात आता प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा उडी घेतली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT