नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
Heavy Rain
Heavy RainSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. गतवर्षी आजअखेर जवळपास 70 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र जवळपास 55 मिलिमीटरच पाऊस (Rain) झाल्याची नोंद असून खरीप हंगामातील शेतीकामे खोळंबोली होती. झालेल्या पावसाच्या आधारे जवळपास 40 ते 45 टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदुरबार (Nandurbar) जिल्हा वासियांना सकाळपासूनच वरून राजाचे आगमन झाले आहे. (nandurbar news Presence of heavy rains in district)

Heavy Rain
तलवार, चाकू बाळगून असलेला तरुण पोलिसांच्‍या ताब्‍यात

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. सकाळी पावसाची रिपझीप सुरु होती. मात्र दुपारी मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्याभरात पुर्णतः ढगाळ वातावरण असुन या मुसळधार पावसाने काहीसे समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. जिल्ह्यात अवघ्या 40 ते 45 टक्केच पेरण्या पुर्ण झाल्या असुन नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱया वीरचक्क धरणात देखील अवघा 22 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणी टंचाईचे मोठे संकट उभे टाकले होत. अशातच या पावसामुळे काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे.

प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी

नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षीही लघू आणि मध्यम प्रकल्पांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नव्हता. अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अखेर आज झालेला पाऊस सातपुड्यासह सपाटी भागातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर तालुक्यांमध्ये दमदार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com