electric bike catcher fire on road in wai saam tv
महाराष्ट्र

Electric Bike Fire News: वाईत खळबळ, प्रवासातच इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट

या घटनेमुळे काही काळ रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत झाली.

ओंकार कदम

Satara News :

सातारा जिल्ह्यातील वाई शहरात मध्यवर्ती ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे चालत्या इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याची घटना आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत बाइक संपुर्णत: जळून खाख झाली. (Maharashtra News)

सुदैवाने या इलेक्ट्रिक बाइकवर असणा-या दाेघांनी प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून बाईक मधून धूर येताच हातातून बाईक सोडली. ते थाेड्या दूर अंतरावर जाऊन थांबले. या घटनेत त्यांची बाईक जळून खाक झाली.

वाई शहरातील मध्यवरती ठिकाणी इलेक्ट्रिक बाइकने पेट घेतल्याने बघ्यांची घटनास्थळी गर्दी झाली. यामुळे काही काळ येथील वाहतुक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती कळताच पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतुक सुरळीत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT