Manasvi Choudhary
केदारनाथला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून केदारनाथ धाम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले आहेत. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
मुंबई-पुण्याहून पर्यटक केदारनाथला भेट देतात. तुम्ही देखील मुंबईहून प्रवास करत असाल तर सोपा मार्ग जाणून घ्या.
केदारनाथला रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्ही मुंबई रेल्वेस्टेशन ते केदारनाथ जवळचे ऋषिकेश रेल्वे स्टेशन असा प्रवास करू शकता.
ऋषिकेशहून केदारनाथ पोहोचण्यासाठी टॅक्सी, बस किंवा जीप या वाहनांनी प्रवास करू शकता. रेल्वेने जायचे असल्यास तुम्ही वेळापत्रक तपासून आधीच तिकीट बुक करा.
बसने प्रवास करणाऱ्यांसाठी केदारनाथ यात्रा सोयीस्कर असेल. मुंबईहून हरिद्वार किंवा ऋषिकेशला जाणाऱ्या बसने तुम्ही प्रवास करू शकता. एसी आणि नॉन एसी दोन्ही बसेसचे पर्याय तुमच्यासाठी आहेत.
हरिद्वार किंवा ऋषिकेशहून केदारनाथ मंदिरात जाण्यासाठी तुम्ही गौरीकुंड या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी, बस किंवा जीप या वाहनांचा पर्याय निवडू शकता
तुम्हाला जर कमी वेळात प्रवास करायचा असल्यास तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. तुम्ही मुंबई विमानतळ ते डेहराडून जॉली ग्रांट विमानतळ असा प्रवास करू शकता.
डेहराडून ते केदारनाथ तुम्ही हेलिकॉप्टर असा प्रवास करू शकता. डेहराडूनमध्ये सहस्त्रधारा येथून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहेत.