Sambhaji Nagar News Saam Tv
महाराष्ट्र

Electric Bike Blast : इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा भीषण स्फोट, महिला गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजीनगर जिल्ह्यात इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

बॅटरी दुकानात इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्जिंगदरम्यान फुटली

स्फोटात बाजूला बसलेल्या वृद्ध महिला गंभीर जखमी झाली

नागरिकांनी तत्काळ मदत करून त्यांना रुग्णालयात हलवले

स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन शेजारीच बसलेली एक वृद्ध महिला गंभीर भाजली आहे. या घटनेनंतर आजूबाजूला उपिस्थत असलेल्या नागरिकांनी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध महिलेचं नाव मुक्ताबाई सर्जेराव पिवळ असे आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या आडूळ येथील बसस्थानक परिसरातील बॅटरीच्या दुकानात घडली आहे. आडूळ बसस्थानकावर शुभम उत्तमराव पिवळ यांच्या मालकीचे बॅटरी दुरुस्ती व खरेदी-विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शुभम यांनी एका इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी काढून दुकानात चार्जिंगला लावली. यानंतर ते जेवण करायला बसले.

यावेळी दुकानात मुक्ताबाई पिवळ या बाजूला बसलेल्या होत्या. याचवेळी चार्जिंगला लावलेल्या बॅटरीचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी शुभम यांच्या दुकानात धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मुक्ताबाई यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान मुक्ताबाई पिवळ यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही घटना घडताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. तुम्हीदेखील अशा प्रकारच्या चार्जिंगवरील दुचाकी वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरा आणि अशा घटनांपासून सावध राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला उमेदवाराच्या सभेत भाजप आमदाराच्या समर्थकांचा मोठा राडा आणि शिवीगाळ|VIDEO

Andhra Pradesh Accident Video : बाईकला वाचवताना भरधाव ट्रक दुसऱ्या लेनमध्ये घुसला, कारला धडकून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Father Of Anushka Sharma: कडक शिस्त अन् देशाचे संरक्षक, अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील काय काम करायचे ?

SCROLL FOR NEXT