shivsena political news Saam tv
महाराष्ट्र

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Ahilyangar politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या घरावर निवडणूक प्रशासनाने धाड टाकली. त्यानंतर शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे.

Saam Tv

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलंय .

निवडणूक प्रशासनाने शिंदे गटाच्या नेत्याच्या घरावर धाड टाकल्याची समोर आलीये.

या धाडीनंतर संबंधित नेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडलीये

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अहिल्यानगरमध्ये महायुतीमध्ये लढत पाहायला मिळत आहे. नगरमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे. तर शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढत आहेत. या निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रशासनाने शिंदे गटाच्या नेत्याच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली.

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण शहराचं राजकीय वातावरण तापलंय. शिंदे गटाचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना प्रशासकीय कारवाईच्या तीव्र मानसिक दबावामुळे थेट हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आलीये. या घटनेने मोठी राजकीय खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आगरकर मळा येथील अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी निवडणूक प्रशासनाच्या पथकाने सायंकाळी धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.

पोलीस बंदोबस्तासहित वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा घरात दाखल झाल्याने वातावरण तणावपूर्ण झालं. यावेळी कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कारवाईमुळे उमेदवार शिंदे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला. त्यानंतर या तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीये. याबाबत अनिल शिंदे यांची पत्नी शीला शिंदे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेत.

शिंदे गटाचा आरोप

'राजकीय दबावातून हा प्रकार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना आपला पराभव समोर दिसू लागल्याने त्यांनी हा खेळ सुरू केला आहे, असा आरोप शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! पतीने फोन चेक केला; पत्नीने छातीवर बसून ओढणीने आवळला गळा, सासूने दार उघडलं अन्...

पुणेकरांची चिंता वाढली! पाऊस सुरू असूनही 'या' धरणांनी तळ गाठला; तुमच्या भागाला पाणी पुरवणाऱ्या धरणाची काय स्थिती?

पावसाळ्यात त्वचेवर खाज आणि पुरळ येतात? ताबडतोब करा 5 घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

SCROLL FOR NEXT