Maharashtra Assembly Election SaamTV
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election : निवडणूक आचारसंहिता कधी लागणार? वेगवेगळ्या दाव्यांमध्ये उत्सुकता वाढली

Maharashtra politics : राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या तारखांच्या दाव्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election Date : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केलेल्या वेगवेगळ्या दाव्यामुळे उत्सुकता वाढली आहे. पण केंद्रीय निवडणूक आयोगाचाच याबाबत अंतिम निर्णय असेल. निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा करु शकते. त्यातच आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. (2024 Maharashtra Legislative Assembly election)

याआधी १० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती, ही शेवटची बैठक असल्याचे बोलले जात होते. या बैठकीत सत्ताधारी पक्षाने अनेक निर्णय घेतले होते. त्यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या दिवशीही सरकारने काही शासन निर्णय जारी केले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते असा कयास बांधला जात आहे. आज सकाळी साडेनऊ वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक असल्याचे बोलले जात आहे.

वेगवेगळे दावे, पण निवडणुका कधी ?

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ किंवा १७ ऑक्टोबर रोजी राज्यात आचारसंहिता जाहीर होऊ शकते. तर आयएएस लॉबीमधील अंदाजानुसार १५ ऑक्टोबरपासूनच आचारसंहिता जाहीर होऊ शकते. आचारसंहिता कधी लागणार, याबाबतचे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारपर्यंत आचारसंहिता लागण्याचा अंदाज वर्तवला आहे.

कोणत्याही क्षणी आचारसंहिता -

गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचा आढावा दौरा केला होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असेल, हे लक्षात घेतल्यास कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. कारण, विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत पहिले अधिवेशन घ्यावे लागणार आहेत.

भाजप-काँग्रेसच्या बैठका -

भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची आज महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक होणार आहे. विधानसभेसाठीच्या उमेदवारांवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते दिल्लीत उपस्थित असणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचीही आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. राज्यातील जागा वाटपावर दिल्लीमध्ये चर्चा होणार असल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT