Election Commission extends campaign hours; candidates celebrate much-needed relief before polling.  saam tv
महाराष्ट्र

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Election Commission Extends Campaign Deadline : निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतलाय. आयोगाने प्रचाराची अंतिम मुदत वाढवली आहे. उमेदवारांना १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा देण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • आता उमेदवारांना १ डिसेंबर रोजी १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार

  • या निवडणुकांसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार

  • ३ हजार ३५५ मतदान केंद्रे तयार करण्यात आलीत.

नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मतदान केंद्रांचा आढावा घेतला जातोय. या निवडणुकांसाठी १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदान करणार आहेत. यासाठी १३ हजार ३५५ मतदान केंद्रे तयार करण्यात आलीत. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी खबरदारी घेण्यात येतेय. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. आयोगाने प्रचाराचा वेळ वाढवलाय. ऐनवेळी हा निर्णय का घेण्यात आलाय हे जाणून घेऊ.

निवडणुकीच्या प्रचारात सर्व राजकीय पक्षांचे नेते व्यस्त आहेत. त्याच दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केलाय. पण बदलामुळे उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. कारण आता उमेदवारांना १ डिसेंबर रोजी १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. आता नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत ५ वाजेपर्यंत प्रताचर करण्याची वेळ निश्चित होती. परंतु आता त्यात वाढ करण्यात आलीय.

उमेदवारांना १ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ ’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० पर्यंत असेल, अशी माहिती निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांनी दिलीय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आलाय. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाहीये.

वेळ का वाढवण्यात आली?

नगरपालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना २६ नोव्हेंबरला चिन्हाचे वाटप करण्यात आले. या उमेदवारांना प्रचारासाठी खूप कमी म्हणजे फक्त चार दिवसांचा वेळ मिळणार होता. मात्र आता निवडणूक आयोगाने प्रचाराला वेळ वाढवल्याने अपक्ष आणि स्थानिक पक्षांच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

SCROLL FOR NEXT