Revdanda Police Satation राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad Crime: आईला घरी का नेलं? मोठ्या भावाचा लहान भावावर तलवारीने वार

लहान भावाने आईला भावाने स्वतःच्या घरी नेल्याने आरोपी भावाने घरातील तलवार आणून तू आईला का नेलेस असा जाब विचारून तलवारीने वार केला. भावाने केलेला वार हा किरकोळ असला तरी लहान भाऊ यामध्ये जखमी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - आई आणि मुलाच्या भांडणात लहान भावाने मध्यस्ती करून आईला आपल्या घरी नेले. हा राग मनात धरून मोठ्या भावाने लहान भावावर तलवारीने (Sword) वार करून दुखापत केल्याची घटना रेवदंडा येथे 6 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत रेवदंडा पोलीस (Revdanda Police) ठाण्यात मोठ्या भावावविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Raigad Crime News)

हे देखील पहा -

अलिबाग (Alibag) तालुक्यातील रेवदंडा (Revdanda) गावातील मोठे बंदर परिसरात आरोपी आणि लहान भाऊ आईसोबत हे एकमेकांच्या शेजारी राहतात. 6 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी (Accused) आणि आई यांच्यात भांडण सुरू झाले. लहान भाऊ याने दोघांचे भांडण मिटवून आईला आपल्या घरात नेले. आईला भावाने स्वतःच्या घरी नेल्याने आरोपी भावाने घरातील तलवार आणून तू आईला का नेलेस असा जाब विचारून तलवारीने वार केला. भावाने केलेला वार हा किरकोळ असला तरी लहान भाऊ यामध्ये जखमी झाला आहे.

लहान भावाने घडलेला प्रकार रेवदंडा पोलिसांना सांगितला असून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही के सरके हे पोलीस निरीक्षक अशोक थोरात याच्या मार्गदशनाखाली पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अबब! गुजरातमध्ये 'बेनाम' पक्षांना ४३०० कोटींच्या देणग्या, निवडणूक आयोग पुन्हा राहुल गांधींच्या निशाण्यावर

Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना; पत्नी सुमित्रा म्हणाल्या, ही शेवटची लढाई|VIDEO

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : विघ्नहर्ता, सुखकर्ता गणरायाचं वाजतगाजत आगमन, राज्यात उत्साहाचे वातावरण

कुख्यात गुन्हेगाराची हॉटेलमध्ये हत्या, सपासप वार करत घेतला जीव, बीडमधील रक्तरंजित थरार कॅमेऱ्यात कैद

500 ग्राम जिलेबी खाल्ल्याने किती प्रमाणात ब्लड शुगर वाढतं?

SCROLL FOR NEXT