raj thackeray uddhav thackeray eknath shinde x
महाराष्ट्र

शिंदेंना हवी ठाकरेंशी युती? राज-उद्धव युतीत शिंदेंचा खोडा? ठाकरे बंधू मायदेशी, युतीची चर्चा कधी?

Maharashtra Political News : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची चर्चा सुरु असतानाच शिंदेसेनेने मोठा डाव टाकलाय. आता राज ठाकरे शिंदेंच्या डावाला बळी पडणार की ठाकरे ब्रॅड जपण्यासाठी उद्धव ठाकरेंना टाळी देणार? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट...

Yash Shirke

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालण्याची नवी रणनीती आखल्याची चर्चा सुरु झालीय. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. शिंदें सेनेकडून राज ठाकरेंना युतीचा प्रस्ताव देण्यासाठीच ही भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. सुमारे तासभर शिंदेसेना आणि मनसेत युतीसंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र उदय सामंतांनी राजकीय भेट नसल्याचा दावा केलाय.

दुसरीकडे उदय सामंतांनी दिलेलं पुष्पगुच्छ राज ठाकरेंनी स्विकारलं नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानसभेत शिंदेसेनेमुळे बसलेला फटका राज ठाकरे अद्याप विसरलेले दिसत नाहीयत. शिंदेसेनेने दिलेल्या उमेदवारामुळे अमित ठाकरे यांचा माहिम मतदारसंघात पराभव झाला. त्यामुळे राज ठाकरेंनी सध्या वेट अँण्ड वॉचचीच भूमिका घेतलीय.

एका मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साद घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. आता दोन्ही ठाकरे परदेश दौरा आटोपून आलेत..मात्र चर्चा काही पुढे सरकलेली नाही,. आणि त्यामुळेच त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं सांगत संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या कोर्टात युतीचा चेंडू टोलवलाय.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला महापालिका निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे शिंदेसेनेने युतीचा प्रस्ताव ठेवलाय, अशी चर्चा आहे. त्यात राज ठाकरेंनी अद्याप कुणाच्याच युतीचा प्रस्ताव स्विकारलेला नाही. पुढील रणनिती आखूनच राज ठाकरे युती करतील. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीचं पुढे काय होणार? आणि महायुतीकडूनही युतीचा प्रस्ताव आल्यानं राज ठाकरे पुन्हा महायुतीच्याच तंबूत जाणार का? याकडे लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT