Deepak Kesarkar, Sanjay Shirsat Saam Tv
महाराष्ट्र

संजय शिरसाट नाराज आहेत का? दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

मंत्रिमंडळ विस्तारात आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर: शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाला, दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळात शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली नाही. त्यामुळे आमदार शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आज शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार संजय शिरसाट यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. शिरसाट यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नसली तरी त्यांना मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात संधी मिळणार आहे. ते नाराज नाहीत. आमदार भारत गोगावले, बच्चू कडू यांना देखील दुसऱ्या टप्प्यात संधी मिळणार आहे, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात या सर्वांना मंत्रिपद मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री केवळ दोन ते तीन तास झोपतात, असे व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांचा उपयोग राज्याने करून घेतला पाहिजे. राजकारण थोडे बाजूला ठेवले पाहिजे. पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. (Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या शहीद या वक्तव्यावर बोलताना केसरकर म्हणाले, छोट्या शब्दामधून चुकीचा अर्थ काढणे योग्य नाही. शिंदे हे नक्षलग्रस्त भागात काम करत होते. त्यावेळी त्यांना अनेक धमक्या आल्या आहेत. त्यावेळी जर कुठे दगाफटका झाला असता तर ते शहीदच झाले असते, असे स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT