आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोण जिंकणार? रिकी पाँटिंगने केली 'ही' भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारत विरुद्ध पाकिस्तान होणाऱ्या सामन्यावर एक मोठे भाकीत केले आहे.
Ricky Ponting
Ricky PontingSaam Tv
Published On

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारत विरुद्ध पाकिस्तान होणाऱ्या सामन्यावर एक मोठे भाकीत केले आहे. भारतीय संघाकडे इतर संघांपेक्षा चांगली लाइनअप आहे, आणि ते आशिया चषक 2022 जिंकण्यासाठी फेव्हरिट आहेत, असा विश्वास रिकी पाँटिंगने व्यक्त केला आहे.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करेल असा विश्वास रिकी पाँटिंगने व्यक्त केला आहे. २८ ऑगस्ट रोजी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे सर्व चाहत्यांच्या नजरा दुबईकडे असणार आहेत.

Ricky Ponting
MI Emirates : UAE लीगसाठी मुंबई इंडियन्स टीमची घोषणा, पोलार्ड-ब्राव्होसह 'या' खेळाडूंचा केला समावेश

आशिया चषक स्पर्धेत भारत सध्या १३ सामन्यांत ७-५ ने आघाडीवर आहे, पाँटिंगला प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीच्या लढतीची अपेक्षा असताना, भारताच्या विजयाची शक्यता जास्त आहे, असे त्याचे मत आहे. 'पाकिस्तानविरुद्ध २८ ऑगस्टचा सामना जिंकण्यासाठी मी भारतीय टीमसोबत असणार. भारत हा पाकिस्तानपेक्षा चांगला संघ आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत, असा विश्वासही पाँटिंगने व्यक्त केला.

Ricky Ponting
काय सांगता? सौरव गांगुली पुन्हा कर्णधार; भारतीय संघाची घोषणा, पाहा प्लेईंग ११

भारत हा केवळ आशिया चषक नव्हे तर कोणत्याही स्पर्धेत पराभूत करण्यासाठी कठीण प्रतिस्पर्धी आहे. फक्त आशिया चषकच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेत भारताच्या पुढे जाणे नेहमीच अवघड असते. आपण T20 विश्वचषकाबद्दल बोलतो तेव्हा मला वाटते की भारत नेहमीच पुढे आहे, असा विश्वासही रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com