काय सांगता? सौरव गांगुली पुन्हा कर्णधार; भारतीय संघाची घोषणा, पाहा प्लेईंग ११

गांगुलीला पुन्हा एकदा भारताचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.
 Sourav Ganguly
Sourav GangulySaam TV

नवी दिल्ली : बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष तसेच टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सौरव गांगुली हा कर्णधार म्हणून पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे. ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे. सौरव गांगुलीने कर्णधारपद सोडून तसेच क्रिकेट मधुन निवृत्ती स्वीकारून आता बराच काळ लोटलाय. पण सौरव गांगुलीला पुन्हा एकदा भारताचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. (Sourav Ganguli Indian Team Latest News)

 Sourav Ganguly
Shikhar Dhawan Ind vs Zim | शिखर धवनसोबत दगा?; राहुलकडे नेतृत्व दिल्यानंतर क्रिकेट चाहते भडकले, म्हणाले...

भारताला स्वातंत्र्य मिळून यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा सोहळा खास बनवण्यासाठी देशात अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका खास क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या सामन्यांत गांगुली कर्णधारपद सांभाळणार आहे.

हा सामना लिजेंड्स क्रिकेट लीग अंतर्गत खेळवला जाईल. १६ सप्टेंबरपासून या लीगची सुरूवात होईल. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १५ सप्टेंबरला भारताचा संघ महाराजा संघाचा सामना इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वर्ल्ड जायंट्स संघांसोबत होणार आहे. हा सामना भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या समारंभाला समर्पित असेल. आयोजकांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

एलएलसीचे उपायुक्त रवी शास्त्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आमचे स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या वर्षी लीगच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.

असा असेल भारताचा महाराजा संघ

सौरव गांगुली (कॅप्टन), विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, ए. बद्रीनाथ, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल, युसूफ पठान, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक दिंडा, आरपी सिंह, अजय जडेजा, जोगिन्दर शर्मा, रीतिंदर सिंह सोढी आणि इरफान पठान

इयॉन मॉर्गन (कॅप्टन), हर्षल गिब्स, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, लेडंल सिमंस, जॅक कॅलिस, नाथन मॅकलम, जॉटी ऱ्होड्स, मशरफे मोर्तजा, असगर अफगान, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, ब्रेट ली, केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन, मिचेल जॉनसन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com