eknath shinde Saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : 'शेतकरी भिकारी नसून...' म्हणणाऱ्या कोकाटेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? वाचा

Eknath Shinde on manikrao kokate : माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ते वर्ध्यात बोलत होते.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही

Wardha : माणिकराव कोकोटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शेतकरी भिकारी नसून शासन भिकारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कोकाटे यांनी केलं आहे. कोकाटेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. माणिकराव कोकोटे यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. 'मंत्री महोदयांनी असे बोलू नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हे शिबिर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलं होतं. तसेच आज अजित पवारांचा देखील वाढदिवस आहे. शिबिरानिमित्ताने एकनाथ शिंदे वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही मी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवार देखील अतिशय शिस्तीने काम करणारे उपमुख्यमंत्री आहेत. खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी वेळ पाळणारे आणि वेळेवर उपस्थित राहणारे अतिशय शिस्तबद्ध अशा काम करणारे अजित पवार यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा'.

माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणावर एकनाथ शिंदे म्हणाले, 'जे काही प्रकार सुरू आहेत. या बाबतीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. त्या बाबतीमध्ये योग्य ती पडताळणी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल'.

'शेतकरी आमचा अन्नदाता आहे. मायबाप आहे आणि बळीराजा हा कायम सुखी असावा. मी मगाशी भाषणाची बोललो की, चांगला पाऊस येऊ दे की पिकू दे. बळीराजा सुखी राहू दे. आम्ही बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो. शेतकरी भिकारी नाही शासन भिकारी आहे असं मंत्री महोदयांनी बोलू नये. माणिकराव कोकाटे यांच्या बाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवारांकडे आहे. ते जे काही बोलले, त्याची वास्तविकता काय आणि वस्तूस्थिती काय आहे हे पाहतील, असे शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छावाचे विजय घाडगे मारहाण प्रकरणातील राष्ट्रवादीचे सुरज चव्हाणसह 10 आरोपी अटक

Ration Card KYC: रेशन कार्ड केवायसी कसं करायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत घ्या जाणून

Sindhudurg : आनंदाची बातमी! नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला; पाहा VIDEO

Sangli : विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण; पडळकर बंधूंच्या कॉलची पोलिसांनी तपासणी करावी, शिंदेसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Butter Chicken Recipe: गटारीनिमित्त घरीच बनवा 'बटर चिकन' ; वाचा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT