Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : मुख्यमंत्री फडणवीसांचं जाहीर कौतुक, एकनाथ शिंदेंची भविष्यावर नजर? वाचा स्पेशल रिपोर्ट

Eknath Shinde, Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक केल्यानं राजकीय वर्तुळात भविष्यातील घडामोडींवर चर्चांना उधाण आलं आहे. एक नंबर-दोन नंबर वाद, नाराजी आणि संभाव्य बदल यावरून सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

Bharat Mohalkar

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलंय... या कौतूकाचे विधानसभेत कसे पडसाद उमटले?. हे कौतूक करण्यामागे कोणतं कारण असू शकतं?. आणि शिंदेंच्या कौतूकानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय उत्तर दिलंय...पाहूयात....

हे वक्तव्य ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...कारण पुन्हा न मिळालेलं मुख्यमंत्रिपद, पालकमंत्रिपदाचा वाद, शिंदेसेनेविरोधात भाजपचं ऑपरेशन लोटस यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदेंनी थेट अमित शाहांच्या दरबारी मुख्यमंत्री फडणवीसांची तक्रार केल्याची चर्चा रंगली होती...मात्र या नाराजीनाट्यानंतर सगळी कटुता विसरुन अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचा बिग डी असा उल्लेख करत जाहीर रित्या तोंडभरून कौतुक केलंय.

विशेष म्हणजे या कौतुक सोहळ्यामुळे विधानसभेतही थेट एक नंबर आणि दोन नंबरवरून जोरदार चर्चा रंगली. लाडकीच्या चर्चेदरम्यान जयंत पाटलांनी एक नंबर हा एक नंबर असतो असा टोला शिंदेंना लगावल्यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी आमच्या नंबर अदलीबदली होत असतो असं सूचक विधान करत भविष्यातल्या घडामोडींचे संकेत दिले की काय अशी चर्चा सुरू झालीय.

फडणवीसंबाबत शिंदेंनी अचानक सूर का बदलले? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. कारण राजकारण हा शक्यतांचा खेळ असतो...आणि त्यामुळेच भविष्यात जर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि एक नंबरचा नेता केंद्रात गेलाच तर दोन नंबरच्या शिंदेंना पुन्हा एक नंबरच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळून शकते...आणि त्यामुळेच की काय भविष्यावर नजर ठेवून शिंदेंनी हा कौतुक सोहळा केल्याची चर्चा आता रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT