Former Minister Vinayak Patil joins Shiv Sena in presence of Eknath Shinde along with hundreds of supporters in Thane. saam tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! माजी मंत्र्याने शेकडो कार्यकर्त्यांसह हाती घेतला धनुष्यबाण, राष्ट्रवादीला खिंडार

Vinayak Patil Joins Shiv Sena In Presence Of Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचा मोठा राजकीय डाव! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री विनायक पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

Omkar Sonawane

ठाणे: राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. विधापरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ठाणे येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

विनायक पाटील यांच्यासोबत लातूरमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही हाती 'धनुष्यबाण' घेतला आहे. पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून लातूरच्या राजकारणात सक्रिय असून, त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी होती. मात्र, आता त्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.

लातूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार

विनायक पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे लातूर ग्रामीण आणि जिल्ह्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या कामाच्या धडाक्यावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये लातूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Party: सरकारला प्रश्न विचारणारे पाकिस्तानी आहेत का? अभिजीत दीपके यांचा सवाल

Maharashtra News Live Update: पुण्यातील हाऊस पार्टीमध्ये आलेल्या पोरांची मुजोरी

Shocking : १९ वर्षीय प्रेयसीला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला; हैवान बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

PF Interest Rate: सरकार तुमच्या पीएफचं व्याज खात्यात कधी जमा करेल? डेडलाईन का चुकली? PFची नवीन अपडेट

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट

SCROLL FOR NEXT