PF Interest Rate: सरकार तुमच्या पीएफचं व्याज खात्यात कधी जमा करेल? डेडलाईन का चुकली? PFची नवीन अपडेट

EPFO Interest Rates: कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफओने ८.२५ टक्के व्याजदर जाहीर केला आहे.
EPFO Interest Rates
EPFO Updategoogle
Published On

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने मार्च २०२६ मध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याज देण्याचं जाहीर केलं होतं. आता आर्थिक वर्षे सुरु होऊन दोन महिने झाले तरी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज आलेलं नाही.

आता ईपीएफओच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे कधी येणार याचं टेन्शन आलं आहे. सध्या ईपीएफओच्या कर्मचारी संघटनेने कोणतीही काळजी करू नका असं सांगितलं आहे. तसेच लवकरात लवकर पीएफ खात्यात पैसै जमा केले जातील असंही त्यांनी सांगितलं आहे.

EPFO Interest Rates
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; या राज्यात महागाई भत्ता 60 टक्क्यांवर

ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) मार्च २०२६ मध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफवर ८.२५ टक्के वार्षिक व्याजाच्या दराची शिफारस केली होती. तेव्हापासून शासकीय मंजुरी सुचना कधी येतील? याची कर्मचारी वाट पाहत आहेत. या अपडेटनंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

पीएफ खात्यात उशीरा व्याज येण्याचं कारण काय?

पीएफ खात्यात उशीरा व्याज जमा होण्यामागे काही प्रशासकीय प्रक्रिया कारणीभूत असतात. त्यामध्ये लाखांहून जास्त खात्यांचा डेटा तपासतात, त्याच्या नोंदी केल्या जातात आणि त्यानंतर व्याजाची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रीया सुरु केली जाते. यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामागे मागच्या काही वर्षांमध्येही जून किंवा जुलै महिन्यात व्याज खात्यांमध्ये जमा करण्यात आलं होतं.

यामध्ये कर्मचाऱ्यांचं काहीच नुकसान होत नाही. व्याज जर उशीरा जमा झाला तरी सदस्यांचं कोणतंही आर्थिक नुकसान होत नाही. EPFO च्या नियमांनुसार, व्याजाची गणित हे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी केलं जातं. त्यामुळे खात्यात व्याजाची नोंद उशिरा झाली तरी कर्मचाऱ्यांना पूर्ण व्याज मिळतं.

EPFO Interest Rates
Joint Pain: वय ३० पण सांधेदुखी ६० सारखी? तरुण वयात हाडांचे आजार का वाढतायत? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com