Eknath Shinde NEws SaamTv
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना 'नो इंटरेस्ट'?; उपमुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेतून या ५ नेत्यांची नावं आघाडीवर

Maharashtra DCM Post : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेलं असताना आता राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपदाच्या सूत्रानुसार शिंदेसेनेकडून हे पद कोणाला मिळणार याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Saam Tv

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे आता जवळपास निश्चित झालं आहे. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला आहे. मुख्यमंत्री जर भाजपचा झाला, तर उपमुख्यमंत्री कोण असतील याबाबत चर्चा सुरू आहे. त्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असणार यात आता शंका नाही. पण मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील का, हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास अनुकूल नाहीत, असे सांगण्यात येत आहे. मग अशावेळी शिंदे कुणाच्या खांद्यावर जबाबदारी देणार, याचीच चर्चा सुरू आहे. आता उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) पाच नेत्यांची नावे आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एकतर्फी विजय मिळवलेल्या महायुतीकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठका देखील सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार असून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यावर आता उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर शिंदेंकडून स्वीकारली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद घ्यावे, अशी त्यांच्या काही नेत्यांची इच्छा आहे. तसे काही नेत्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेनेतील अन्य नेत्याला द्यावं असा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जर शिंदे स्वत: उपमुख्यमंत्री होणार नसतील तर हे पद कोणाला दिलं जाणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांची नावं देखील समोर आली आहेत. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर ते त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ते हे पद सोपवू शकतात का? तशी शक्यता आहे का? अशा वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

श्रीकांत शिंदेंकडे सोपवणार का जबाबदारी?

श्रीकांत शिंदे सध्या लोकसभेचे खासदार आहेत. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा होण्यामागे आदित्य ठाकरे यांची शिवसेना उबाठा गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली नियुक्ती हा देखील एक भाग असू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे हे श्रीकांत यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावून त्यांचे राजकीय भवितव्य प्रस्थापित करतील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

'या' नेत्यांची नावं देखील चर्चेत

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय असलेल्या नेत्यांची नावं देखील उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे येताना दिसत आहे. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वतीने दीपक केसरकर आणि भरत गोगावले यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर, यांच्यापैकी कोणावरही ते विश्वास दाखवू शकतात, असे बोलले जात आहे.

दरम्यान, जळगाव ग्रामीणचे आमदार असलेले गुलाबराव पाटील यांचंही नाव या शर्यतीत आहे. पाटील यांच्या मतदारसंघात 'संभाव्य उपमुख्यमंत्री' असे पोस्टरही लावण्यात आले आहे. त्याचवेळी उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दादा भुसे आणि उदय सामंत हे शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. सत्तास्थापनेच्या सर्व महत्वाच्या निर्णयात ते शिंदे यांच्यासोबत असतात. यावेळी दादा भुसे हे सलग पाचव्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे यावेळी त्यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उदय सामंत यांनी याविषयी बोलताना यांचे सर्व राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे. ते आमच्यासाठी जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT