Shiv Sena leaders during a party event as the list of 40 star campaigners is announced for civic polls. saam tv
महाराष्ट्र

Corporation Elections: ठाकरे बंधूंची युती होताच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या 40 शिलेदारांना दिली मोठी जबाबदारी

Shivsena Star Campaigners List : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर झाल्याचे जाहीर केले. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यामुळे एकनाथ शिंदे महापालिकेच्या निवडणुकीत एका पाऊल पुढे चाल खेळत असल्याचं दिसत आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज

  • शिंदे सेनेकडून ४० स्टार प्रचारकांची अधिकृत घोषणा

  • मुंबईसह राज्यभर प्रचाराची जबाबदारी नेत्यांवर सोपवली

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईसह राज्यातील इतर महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आज युती झाली. तर दुसरीकडे शिंदे सेनाही कामाला लागली असून त्यांनी आज आपल्या प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाने ४० नेत्यांवर महापालिकेच्या प्रचाराची जबाबादारी सोपवलीय.

पक्षातील ४० नेते प्रचारांचा धुरळा उडवणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे "स्टार प्रचारक" म्हणून ४० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेने बदल केलाय. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलंय.

स्टार प्रचारकांची यादी

एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री

रामदास कदम, नेते

गजानन कीतीकर, नेते

आनंदराव अडसूळ, नेते

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते

प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री

डॉ.निलमताई गोन्हे, नेत्या

मिनाताई कांबळी, नेत्या

गुलाबराव पाटील, नेते व मंत्री

दादाजी भुसे, उपनेते व मंत्री

उदय सामंत, उपनेते व मंत्री

शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री

संजय राठोड, मंत्री

संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री

भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री

प्रकाश आबिटकर, मंत्री

प्रताप सरनाईक, मंत्री

आशिष जयस्वाल, राज्यमंत्री

योगेश कदम, राज्यमंत्री

दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार

श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार

धैर्यशील माने, खासदार

संदीपान भुमरे, खासदार

नरेश म्हस्के, खासदार

रवींद्र वायकर, खासदार

मिलिंद देवरा, खासदार

दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री

शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार

राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार

मनिषा कायंदे, सचिव व आमदार

निलेश राणे, आमदार

संजय निरुपम, प्रवक्ते

राजू वाघमारे, प्रवक्ते

ज्योती वाघमारे, प्रवक्ते

पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष

राहुल लोंढे, युवसेना सचिव

अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग

शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या

गोविंदा अहुजा, माजी खासदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला अचानक आग

SCROLL FOR NEXT