MLA Sanjay Gaikwad 
महाराष्ट्र

Buldhana Politics: शिंदे गटाच्या आमदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल; संजय गायकवाड यांना स्टंटबाजी भोवली

MLA Sanjay Gaikwad: शिंदे गटाचे आमदार संजय गायवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय आहे प्रकरण हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

संजय जाधव, साम प्रतिनिधी

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना स्टंट करणं त्यांच्या अंगाशी आले आहे. वाढदिवसाला तलवारीने केक कापणं आणि तलवारीनेच इतरांना केक भरवणं त्यांना महागात पडलंय. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलीस कायदा १३५ अन्वये कलम ३७ (१) (३) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काय आहे प्रकरण जाणून घ्या

हाती आलेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी संजय गायकवाड यांच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यावेळी आमदार गायकवाड यांनी हजारो नागरिकांसमोर तलवारीने केक कापला आणि आपल्या पत्नीला व इतरांना तलवारीनेच केक भरवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो घेत सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्या प्रकरणी केला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी दिलीय.

व्हिडिओ व्हायरल

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र, मृत्युंजय गायकवाड यांचा गुरुवारी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गुरुवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला. याच तलवारीने कापलेला केक आपली पत्नीला भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो.

याआधीही दाखल झालाय गुन्हा

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांचे पुत्र मृत्यूंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर आधीही गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेती बळकावल्याच्या आरोपाखाली दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हे आदेश दिले होते. आमदार संजय गायकवाड यांच्यावर नागपूर येथील रीटा उपाध्याय यांनी राजूर येथील दीड एकर शेतजमीन बळकावल्याचा आरोप केला होता.

त्या शेतावर आमदार संजय गायकवाड यांनी फार्म हाऊस बांधलंय. तसेच संबंधित महिलेला जिवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आल्याचे समोर आले होते. पोलीस कारवाई करत नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायायात दाखल करण्यात आले होते. यावर मोताळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT