Anil Babar Passed Away: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन; राजकीय वर्तुळातून हळहळ

Mla Anil Babar Death: शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Anil Babar Passed Away
Anil Babar Passed AwaySaam TV
Published On

Shivsena Mla Anil Babar Passed Away

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना मंगळवारी (३० जानेवारी) दुपारी त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anil Babar Passed Away
Weather Alert: देशातील अनेक राज्यांवर अवकाळी पावसाचं संकट; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा वेदर रिपोर्ट...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता.

गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणात अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं.

खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते.  टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा ते आमदार राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com