MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangar Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Bangar : माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे करणार; आमदार संतोष बांगरांचं खुल्लं आव्हान

साम टिव्ही ब्युरो

Santosh Bangar News : शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर रविवारी अज्ञात लोकांनी हल्ला चढवला. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे. हल्ल्यानंतर संतोष बांगर यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. हा हल्ला नाही तर भ्याड हल्ला असल्याचं बांगर (Santosh Bangar) म्हणाले. इतकंच नाही तर आपल्यावर हल्ला करणाऱ्यांचे तुकडे-तुकडे करणार असा इशाराही आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. (Santosh Bangar News Today)

आमदार संतोष बांगर हे रविवारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते. यावेळी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत काही लोकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काही लोकांनी संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला देखील चढवला, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय म्हणाले संतोष बांगर?

दरम्यान, गाडीवर हल्ला झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली. 'याला हल्ला म्हणता येणार नाही. हल्ला कशाला म्हणतात. समोरून येवून सामना करतात त्याला हल्ला म्हणतात. हे ठरवून केलेले कृत्य आहे', असं बांगर म्हणाले. 'माझी बहीण आणि माझी पत्नी जर त्या कारमध्ये नसते एक घाव दोन तुकडे केले असते', असं खुलं आव्हानही संतोष बांगर यांनी यावेळी दिलं.

या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सोबत फोन वरून संवाद साधला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले आहे. (Shivsena vs Santosh Bangar)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संघर्ष सुरू झाला. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. तरी सुद्धा अनेकदा शिंदे गटातील आमदार आणि शिवसैनिक आमने-सामने आले. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री तान्हाजी सावंत यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यावेळी हल्लेखोरांना जशाच तसं उत्तर द्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना केलं होतं. दरम्यान, तान्हाजी सावंत यांच्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

Weather Forecast : सावधान! महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस; नाशिकसह ९ जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya: बुधवार या राशींसाठी खास, जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय लिहलंय

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट, तुमची रास?

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

SCROLL FOR NEXT