Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra FadnavisSaam TV

Shivsena : शिवसेना संपेल या भ्रमात राहू नका; 'सामना'तून फडणवीसांसह भाजपवर टीका

'गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये'.

Saamana Editorial On Devendra Fadnavis : 'गेल्या 56 वर्षांत शिवसेनेला (Shivsena) संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमाने आणि तेजाने उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये. अशी टीका शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर करण्यात आली आहे. (Shivsena vs BJP Latest News)

Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra Fadnavis
...अन् आरक्षणाची खाज सुटली; मराठा आंदोलकांबाबत बोलताना तान्हाजी सावंतांचा तोल सुटला

शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या पाठीत खुपसलेले खंजीर पचवले व ते पुढे गेले. त्याच मार्गाने आम्ही पुढे जात आहोत. इतिहासात तोतयांचे बंड म्हणून एक प्रकरण आहे. त्याचा अभ्यास या मंडळींनी केला पाहिजे. आम्ही कोणत्याही युद्धास तयार आहोत. समोरून या नाहीतर पाठीमागून वार करा. तुमचा प्रत्येक घाव शिवसेनेला, महाराष्ट्राला नवे बळ देणार आहे, असंही शिवसेनेकडून ठणकावून सांगण्यात आलंय.

'तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले'

शिवतीर्थावर दसरा मेळावा घेणार आणि त्यांनाच तो अधिकार आहे. या दळभद्री प्रकाराबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने फक्त तुमच्यावर थुंकणेच काय ते बाकी ठेवले. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परंपरा शिवसेनेचीच आहे. फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधडय़ा भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचे सोने विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेने महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्याने. अशी टीकाही भाजपवर करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis News| Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Beed: फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला; खासदार मुंडेंनी जाहीर भाषणातून खडेबोल सुनावले

दसरा मेळाव्यास शिवतीर्थ नाकारले जाते, याची खोल जखम महाराष्ट्राच्या मनावर झाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एक ‘डुप्लिकेट’ पुण्यात आढळला. त्या डुप्लिकेटबरोबर काही हवशा-नवशा-गवशांनी सेल्फी काढल्या म्हणून त्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास दम भरला. ते ‘मिंधे’ असले तरी मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान करू नका. आता हाच न्याय ‘मिंधे’ गटाच्या डुप्लिकेट सेनेस लागायला नको काय? स्वतःचा डुप्लिकेट चालत नाही, पण जे स्वतःच डुप्लिकेट ‘सेना’ चालवीत आहेत त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची खाज सुटली. असा टोलाही सामनातून लगावण्यात आलाय.

चला शिवतीर्थावर… तेथेच भेटू!

शिवसेनेचा दसरा मेळावा आता शिवतीर्थावरच वाजतगाजत, उत्साहाचा गुलाल उधळत होणार. शिवसेनेच्या परंपरेस साजेसा होणार. शिवसेनेच्या दुष्मनांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. संभ्रम निर्माण केला, पण आजपासून महाराष्ट्रात ज्या नवरात्रीचा जागर, आई दुर्गेचा उत्सव सुरू झाला आहे त्या जगदंबेचे आशीर्वादही शिवसेनेला लाभले आहेत. ज्याच्या पाठीशी देवदेवता, महाराष्ट्राची जनशक्ती, त्यांना कुणाचे भय? सत्य, न्याय आणि धर्म हाच महाराष्ट्राचा प्राण आहे. शिवसेना हा धर्म पाळत आली. मुंबई उच्च न्यायालयाने सत्य व न्यायाचा तराजू ढळू दिला नाही. शिवसेनाप्रमुखांचा पवित्र आत्मा त्या न्यायाच्या तराजूवर नक्कीच अभिमानाची फुले उधळत असेल. चला शिवतीर्थावर… तेथेच भेटू! असंही सामनातून ठणकावून सांगण्यात आलंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com