Beed: फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला; खासदार मुंडेंनी जाहीर भाषणातून खडेबोल सुनावले

फंडासाठी स्टेजवर येणाऱ्या कार्यकर्त्याला खासदार मुंडेंनी चांगलेच खडेबोल सुनावले.
Pritam Munde
Pritam MundeSaam Tv
Published On

बीड - आपल्या जिल्ह्याची मानहानी होईल असं वागू नका. 2 वर्ष एखाद्या सभामंडपासाठी वाट पाहिली असेल तर आणखी 10 मिनिटं वाट पाहिली तर काय होईल? मला आतापर्यंत तरी अशी सिद्दी प्राप्त नाही झाली, की मी जिप करून डायरेक्ट गाडीत बसेल. मला देखील स्टेज खाली येऊनचं गाडीत बसायचं आहे. असं म्हणत फंडासाठी निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला, भाजप (BJP) खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी जाहीर भाषणांमधून चांगलेचं खडेबोल सुनावले आहे. त्या बीड शहरातील एका जाहीर कार्यक्रमात बोलत होत्या. (Beed Latest News)

Pritam Munde
Petrol Diesel: पेट्रोल-डिझेल महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

त्या पुढे म्हणाल्या, की मंचावर आपण बसलेलो असतो, असं नाही की तुम्हाला माझं दर्शन खूप लेट होतं. दर आठवड्याला मी येत आहेच. आपल्या इथं कार्यक्रमाला बाहेरून आलेल्या पाहुणे मंडळीचे भाषण सुरू असतांना, आपण फंडाचं पत्र मागणं योग्य आहे का ? आपण आयोजक असतांना, संयोजक असतांना, यजमान असतांना आपण पाहुणे मंडळींचा अशा प्रकारे निरादार करणं योग्य नाही. आपल्या जिल्ह्याची चर्चा करतांना मानहानी होईल, असं वागू नका. असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, समजा एखादा सभामंडप असेल, तुम्ही 2 वर्ष त्याच्यासाठी वाट पाहिली असेल, आणखी 10 मिनिटं वाट पाहा की, मी भाषण संपल्यानंतर स्टेजच्या खालीच येणारचं आहे. अजून मला अशी सिद्दी प्राप्त झाली नाही, की मी स्टेजवरून जिप करत थेट गाडीत जाईल. मला स्टेजच्या खाली यावं लागेल. मग गाडीत बसेल. असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी फंडासाठी स्टेजवर येणाऱ्या कार्यकर्त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. दरम्यान यामुळे प्रीतम मुंडे यांच्या भाषणानंतर, कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच उलट सुलट चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com