Eknath Shinde
Eknath Shinde SaamTvNews
महाराष्ट्र

नक्षलग्रस्त भागातील दोन हजार युवकांना रोजगार; पालकमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

संजय तुमराम

चंद्रपूर : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या (Surajagad project) कार्यक्रमात दोन हजार स्थानिक आदिवासी युवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते रोजगार नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. अतिदुर्गम भागातील या युवकांच्या हाताला काम (job for youngster) मिळावे तसंच बंदुकीच्या दिशेनं जाणाऱ्या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. दरम्यान, लोहखनिज प्रकप्लामुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कार्यक्रमात शिंदे म्हणाले, स्थानिकांना इथल्या खाणीत रोजगार मिळतो की नाही, हा प्रश्न सर्वांना पडलेला असताना प्रकल्पाने स्थानिकांना सामावून घेत या अतिदुर्गम भागात आर्थिक विकासाचा नवा प्रारंभ केला. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेलगत सुरजागड पहाडी असून यात उच्चप्रतीचे लोह आहे. हे लोह खनिज काढायला सुरुवात झाली. पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

चालक- गार्ड- क्रेन चालक- क्रशर चालक- कामगार श्रेणीतील युवकांना नियुक्तीपत्रे दिली गेली. पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय- प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची  सुरुवात झाली. या दक्षिण गडचिरोली भागात 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची संभावना असल्याचंही शिंदे म्हणाले. अतिदुर्गम भागातील नक्षलवाद संपवायचा असेल तर विकास महत्वाचा आहे. या भागाला भारताचे नवे जमशेदपूर करण्यासाठी रेल्वे जाळे पसरविण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, दक्षिण गडचिरोलीच्या एटापल्ली परिसरातील प्रशिक्षित व अप्रशिक्षित युवक-युवतींना सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नोकरी दिली गेल्याने समाधानी आहोत. गारनिर्मिती करून या भागाचा जलद विकास साधला जाईल, असं एका स्थानिक लाभार्थ्याचं म्हणणं आहे. तसंच सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील कच्चे लोखंड गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी भागात प्रक्रिया प्रकल्प उभारून पोलाद निर्मिती केली जाणार आहे. जानेवारी 2023 पर्यंत कोनसरी प्रकल्प यासाठी सज्ज झाला असेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. रोजगार नसल्याने नक्षलवादाकडे वळणाऱ्या युवकांना यामुळे ब्रेक लागेल, अशी अपेक्षा आहे.

Edited by- Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

SCROLL FOR NEXT