मोबाईल स्मार्टफोन (Mobile Smart phone) हे आजच्या युगात लोकांसाठी मनोरंजनाचं (entertainment) एक साधनच बनलं आहे. आताची युवापीढी मोबाईल फोनचा वापर महत्वाच्या कामांसाठी जास्त न करता फक्त मनोरंजन करण्यासाठी करताना दिसतात. फोनवर सेल्फी काढून वेगवेगळे स्टेटस (phone status) ठेवण्यातही हा तरुणवर्ग कमालीचा व्यस्त झाला आहे. मात्र, स्टंटबाजी (Mobile stunts) करून नाव कमावण्यासाठी धोकादायक ठिकाणी दऱ्याखोऱ्यांत सेल्फी काढणं काही जणांच्या (selfie) जीवावर बेतलं आहे. अशीच एक घटना एका व्हायरल व्हिडिओद्वारे (viral video) समोर आली आहे.
अनेक जण मोबाईल फोनवर बोलत असताना किंवा चॅटिंग करताना रस्त्यावर चालत असतात. रस्त्यावरुन जात असताना चालता चालता त्यांची दिशा कधी बदलते याचाही त्यांना भान राहिलेला नसतो. अशाच प्रकारच्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला चक्क रेल्वेच्या ट्रकमध्ये झोपून फोनवर बोलत असते. त्यावेळी भरधाव वेगानं आलेली ट्रेन तिच्यावरुन निघून जाते तरीही तिला कळत नाही. एवढी ती तिच्या फोनमध्ये व्यस्त असते.
आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी मिश्किलपणे टीपण्णी करत एक कॅप्शन लिहिलं आहे. 'फोनपर गॉसिप करना जादा जरुरी है' असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर मजेशीक कमेंट्सही करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, या महिलेला तर मेडल दिलं पाहिजे. दुसऱ्याने लिहिलं, माफ करा मी फोनवर बोलण्यात व्यस्त होते त्यामुळे मला ट्रेन दिसली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.