CSK चा विजयाचा नारळ फुटला; जडेजानं पहिला विजय केला 'या' खास व्यक्तीला 'डेडिकेट'

ms dhoni and Ravindra jadeja
ms dhoni and Ravindra jadejagoogle

नवी दिल्ली : आयपीएलच्या (IPL) १५ व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai super king) प्रतिस्पर्धी संघांसोबत सलग चारवेळा पराभव झाला होता. सीएसकेची या हंगामात निराशाजनक सुरुवात झाल्याने कर्णधार रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) टीम पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत होती. आरसीबी आणि सीएसकेमध्ये मंगळवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडीयममध्ये (DY Patil Stadium) झालेल्या सामन्यात चेन्नईने पहिला विजय मिळवला. आरसीबीवर (RCB) २३ धावांनी मात करत चेन्नईने आपलं विजयाचं खातं उघडलं. चेन्नईने आरसीबीला २१७ धावांच आव्हान ठेवलं होतं, मात्र आरसीबीने ९ विकेट्स गमावत १९३ धावाच केल्या. त्यामुळे चेन्नईला यंदाच्या आयपीएलच्या हंगामात पहिला विजय मिळवला. विशेष म्हणजे चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजाने टीमला मिळालेला पहिला विजय त्याच्या पत्नीला डेडिकेट केला आहे.

ms dhoni and Ravindra jadeja
विश्वचषकाचं क्रेडिट धोनीला; 'बाकीचे १० खेळाडू लस्सी प्यायला गेले होते'... हरभजन भडकला!

टीमचा पहिला विजय केला पत्नीला डेडिकेट

आरसीबीच्या विरुद्ध चेन्नईला मिळालेला पहिला विजय कर्णधार रविंद्र जडेजाने त्याच्या पत्नीला डेडिकेट केला आहे. तसंच चेन्नईच्या टीमला पहिला विजय मिळवून देण्यात रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांचा मोलाचा वाटा होता. या दोघांचेही जडेजाने कौतुक केलं आहे. उथप्पाने ८८ तर शिवमने ९५ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून या सामन्यात १६ षटकार ठोकले. चेन्नईच्या फलंदाजीचं कौतुक करत जडेजानं म्हटलं की, यावेळी आम्ही एक टीम म्हणून चांगलं प्रदर्शन केलं आणि फलंदाजीही चांगली झाली.

उथप्पा आणि शिवमने चांगली कामगिरी केली तसंच गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं. एक कर्णधार म्हणून मी अजूनही वरिष्ठांची मदत घेत असतो. महेंद्र सिंग धोनी आहेतच. मी अजूनही शिकत आहे आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केलं. दरम्यान, मंगळावारी झालेल्या आरसीबी आणि चेन्नईच्या सामन्यामध्ये कर्णधार जडेजाने जबरदस्त कामगिरी करत ४ ओव्हर मध्ये ३९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. चेन्नईचा पुढील सामना १७ एप्रिलला गुजरात टायटन्सच्या विरोधात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com