Cabinet Decision Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मुंबई टोलमुक्त, महामंडळ ते पुणे मेट्रो; मंत्रिमंडळ बैठकीतील १९ महत्वाचे निर्णय

Chief Minister Eknath Shinde big announcement : विधानसभेआधी एकनात शिंदे सरकारकडून निर्णयावर निर्णय घेतले जात आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १९ मोठे निर्णय घेण्यात आलेत.

Namdeo Kumbhar

State Cabinet Maharashtra Political Updates : विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकाने निर्णयांचा सपाटा चालवला आहे. आचारसंहिता लागण्याआधी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्यात आली आहे. आणखी एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय पुणे मेट्रो रेल टप्पा-२ संदर्भातही मोठा निर्णय घेतलाय.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय -

1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)

2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)

3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)

4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)

5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)

6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)

7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)

8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)

9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)

10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)

12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ (सहकार)

13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)

14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)

15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)

16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)

17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट

18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)

19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)

20. दमण गंगा आणि गोदावरी नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

SCROLL FOR NEXT