No Toll Entering in Mumbai: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने टोलमाफीचा मोठा निर्णय घेतलाय. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाच टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णायाचा सहा लाख हलक्या वाहन चालकांना फायदा होणार आहे.
कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?
आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मॉडेला टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका
मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पूलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पूल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी सन १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. २००२ मध्ये पाचही टोलनाके कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू केली होती.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई मधले टोल माफी करण्यात यावी यासाठी वारंवार मनसेकडून आंदोलन करण्यात येत होतं.
अनेक वेळा राज ठाकरे यांनी आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे देखील या संदर्भात भेट घेतली होती.
दादा भुसे काय म्हणाले ?
टोल माफीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 45 आणि 75 रुपये अशी आकारणी केली जात होती.
2026 पर्यंत टोलची मुदत होती. भविष्यातील आणखीन वाढण्याची शक्यता होती. 2 लाखांपेक्षा जास्त वाहनांना याचा दिलासा मिळेल. टोल आंदोलनामध्ये वित्तीय नुकसान करणाऱ्या आंदोलकांबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.