Maharashtra Government Formation : विधानसभेला महायुतीला न भूतो न भविष्य असं यश मिळालं. पण सहा दिवसानंतरही मुख्यमंत्री कोण? कोणती मंत्रिपदे कुणाला? याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. महाराष्ट्रातील सत्तेच्या वाटाघाटी सोडवण्यासाठी तिन्ही घटकपक्षाचे नेते गुरुवारी दिल्लीत दाखल झाले होते. अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत जवळपास अडीच तास चर्चा झाली. यामधये मुख्यमंत्रिपदावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं समजतेय. २४ तासांत अधिकृत नावाची घोषणा होईल. पण या बैठकीतील देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंच्या बॉडी लँग्वेजने सर्व सांगून टाकलेय. मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या आसपास सुरु झालेली बैठक रात्री १२ वाजता संपली. या बैठकीतील फोटो बाहेर आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील भाव सगळं सांगत होते. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. त्यांच्या डोळ्यातील भाव सगळं काही सांगत होताच. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम करतील, असे दिसतेय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना वाटाघाटी करण्यात म्हणावे तसं यश मिळाले, नसल्याचे बोलले जातेय.
उदय सामंत यांचं मुख्यमंत्रिपदावरील वक्तव्य आणि मराठा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप पुन्हा विश्वास दाखवणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. पण गुरुवारी दिल्लीतील फोटो समोर आले अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अमित शाह यांनी पुष्पगुच्छ देत देवेंद्र फडणवीस यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
फोटोत नेमकं काय दडलेय ?
दिल्लीमधील महायुतीच्या फोटोमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज सगळं काही सांगत होती. ऐरव्ही एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठीभेटी घेताना प्रचंड उत्साही असतात. पण दिल्लीमधील शाह यांच्यासोबतच्या भेटीवेळी शिंदे नाराज असल्याचे दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर उदास भाव दिसत होते. त्याउलट देवेंद्र फडणवीस उत्साही आनंदी दिसत होते. या फोटोवरुन एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाल्याचे समजतेय. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेय, असे वाटतेय. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा २४ तासांत होईल,असे राजकीय विश्लेषक सांगतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.