Shinde camp ministers attack Manoj Jarange over Maratha reservation saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange vs Maharashtra Government: शिंदे गटाच्या 5 मंत्र्यांचा जरांगेंवर हल्लाबोल; मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार?

Manoj Jarange vs Maharashtra Government: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १२ दिवस उलटले असून सरकारसोबतचा संघर्ष तीव्र झाला आहे. शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केल्याने मराठा आरक्षण आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Suprim Maskar

  • मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १२ दिवस उलटले असून सरकारसोबतचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

  • मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने जरांगेंना भेटण्यास नकार दिल्याने वादाला नवे वळण मिळाले आहे.

  • जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर शिंदे गटातील पाच मंत्र्यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आता बातमी सरकार आणि जरांगेंच्या पेटलेल्या संघर्षाची. जरांगेंना भेटण्यास शिष्टमंडळानं नकार दिल्यामुळे आता जरांगेंनी थेट सरकारवर आगपाखड सुरू केलीय. मात्र यामुळे आता जरांगे आणि शिंदेसेनेत जोरदार वाद पेटलाय. जरांगेंनी शिंदेंवर कोणता खळबळजनक आरोप केलाय? शिंदेसेनेच्या कोणत्या मंत्र्यांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय? पाहूयात या रिपोर्टमधून.

सरकार आणि मनोज जरांगेमधला वाद दिवसेंदिवस विकोपाला जातोय. मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं जरांगेंना न भेटण्याची भूमिका घेतल्यामुळे आता संघर्ष टोकाला गेलाय. जरांगेंच्या उपोषणाला १२ दिवस उलटली आहेत. मात्र तोडगा निघण्याची कुठलीही शक्यता दिसत नाहीय. त्यामुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय.

त्यात जरांगे आणि शिंदेसेनेतला वाद आणखीनच वाढलाय. जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत एकेरी उल्लेख केल्यामुळे शिंदेंचे मंत्री आक्रमक झालेत. शिंदेंच्या 5 हून अधिक मंत्र्यांनी एकत्र येत जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला असून, या संघर्षानं थेट 'जरांगे विरुद्ध सरकार' असे नवं वळण घेतलयं. दुसरीकडे सत्ताधारी मुंबईतील आंदोलनात हल्ला करणार असल्याचा आरोप करणाऱ्या जरांगेंनी यावेळी मराठा आंदोलनात दंगल घडली तर शिंदेचं जबाबदार असल्याचा आरोप केलाय.

दरम्यान जरांगे पाटलांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे शिंदेसेनेच्या 5 मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलीय..अशातच मंत्री भरत गोगावलेंनी जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच जरांगे पाटलांना दिलाय. तर 12 सप्टेंबला मुंबईत येणारचं काय करायचं ते करा, असं प्रतिआव्हानं जरांगेंनी दिलयं. मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील हा संघर्ष आता केवळ आरक्षणापुरता मर्यादित न राहता थेट राजकीय वर्चस्वाच्या आणि भाषेच्या संघर्षावर येऊन ठेपलाय.

गणेशोत्सवाच्या तोंडावर सत्ताधारी मंत्री आणि जरांगे यांच्यातील हा वाढता संघर्ष पाहता येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... मात्र राजकीय टीकाटीप्पणीमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे पडल्यास मराठा समाजातील रोष आणखी वाढणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT